महाराष्ट्रात भाजपला संघाची मदत नाही

rss
गेल्या पंचवीस वर्षांची शिवसेनेबरोबर असलेली युती तुटल्यानंतर स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाण्याची पाळी आलेल्या भाजपला संघ परिवाराकडून कोणतीही मदत मिळणार नसल्याचे संघाच्या वरीष्ठ नेत्यांनी सांगितले. युती तुटण्याचा प्रकार दुर्देवी असल्याचे सांगून हे नेते म्हणाले भाजपची राज्यातील सर्व जागा लढविण्यासाठीची तयारी अपुरी आहे. अशावेळी कमी वेळात राज्यातील गावागावापर्यंत पसरलेल्या संघाच्या शाखांतील स्वयंसेवक प्रचार कार्यात मदत करतील अशी अपेक्षा भाजपकडून व्यक्त केली गेली असली तरी आम्ही प्रचारकार्यात मदत करणार नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय संघटना नाही. प्रत्यक्ष राजकारणाशी आमचा संबंध नाही. आणीबाणी आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत परिस्थितीच अशी होती की ज्यामुळे संघाने भाजपला प्रचार कार्यासाठी सवतोपरी मदत केली.त्यावेळी आम्ही राष्ट्रहित हे एकच ध्येय मानून प्रचारात मदत केली होती. मात्र राज्यांसाठी ते शक्य नाही. राज्यातील निवडणुकांत पक्षानेच आपला प्रचार कार्यक्रम आखून तो पुरा केला पाहिजे असेही हे नेते म्हणाले.