रिलायन्स जिओचा सॅमसंगशी सहकार्य करार

reliance
रिलायन्स इंडस्ट्रीजने कोरियन इलेक्ट्रोनिक जायंट सॅमसंगशी टेलिकॉम उपकरण खरेदीसाठी करार केला असल्याचे वृत्त आहे. ही उपकरण खरेदी रिलायन्सची टेलिकॉम उपकंपनी रिलायन्स जिओसाठी केली जाणार आहे. याचा एक अर्थ असाही काढला जात आहे की रिलायन्स जिओ २०१५ मध्येच कार्यरत होऊ शकते.

रिलायन्सने त्यासाठी कोरियाच्या एक्झिम कडून ८० कोटी डॉलर्सचे कर्ज घेतले असल्याचेही समजते. रिलायन्स जिओसाठी परदेशी संस्थेकडून घेतले गेलेले हे पहिलेच कर्ज आहे. यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने स्पेक्ट्रम साठी १.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज उभे केले होते. कोरियन एक्झिम रिलायन्स जिओला कर्जातील ६० टक्के रक्कम देणार आहे व उर्वरित रकमेची गॅरंटी देणार आहे. ही उर्वरित रक्कम जपान व कोरियातील बँका तीन्तीन, एएनझेड व एचएसबीसी देणार आहेत.

Leave a Comment