
नवी दिल्ली – काँग्रेसने शुक्रवारी रात्री दुसरी यादी जाहीर केली असून या यादीमध्ये १४३ उमेदवारांना स्थान मिळाले आहे.
काँग्रेसची आणखी १४३ उमेदवारांची यादी जाहीर
सचिन सावंत यांना मुंबईतील मांगठाणे येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रतापराव भोसले यांचे पुत्र मदन भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाजीराव मोघे यांना अर्णी, राजेंद्र मुळक यांना कामटे आणि रोहिदास पाटील यांना धुळे ग्रामीण येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
याआधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या समावेश असलेली काँग्रेसची ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. राष्ट्रवादीसोबतची १५ वर्षांची आघाडी तुटल्यानंतर काँग्रेस स्वबळावर राज्यातील २८८ जागांवर निवडणूक लढवत आहे.





