बकरी ईद साठी करा ऑनलाईन बकरा खरेदी

goat
मुस्लीम बांधवांचा कुर्बानी चा सण म्हणजे बकरी ईद आता १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी बकरा खरेदीची लगबगही सुरू झाली आहे. मात्र ई कॉमर्समुळे आता गर्दीत घुसुन ही खरेदी करण्यापासून ग्राहकांना सुटका मिळणार आहे. कारण कपडे, दागिने, फोन अशा अनेक वस्तूंप्रमाणेच बकरेही ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले गेले आहेत. साईटवर त्यांचा रंग, वजन याबरोबरच किमतीही दिल्या गेल्या आहेत.

ओएलएक्स व अन्य कांही कंपन्यांनी त्या संदर्भातल्या जाहिराती आपल्या साईटवर दिल्या आहेत. बकरे विक्रेतेही या सेवेचा लाभ घेण्यास उत्सुक आहेत. गर्दीत तासन तास उमे राहून आणि शेजारी विक्रेत्याशी स्पर्धा करून आपला माल खपविण्यापेक्षा ऑनलाईन विक्रीला अनेकांनी प्राधान्य दिले आहे तसेच गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनीही ऑनलाईन खरेदीचा मार्ग चोखाळला असल्याचे सांगितले जात आहे.

भागलपूर येथील बकरे विक्रेते हीराखान यांच्या मते ऑनलाईन विक्रीत घासाघीस होत नसल्यामुळे किमत चांगली मिळते शिवाय बाजारातील गर्दीचा त्रासही होत नाही. ऑनलाईन विक्रीसाठी बकर्‍याचा फोटो, वजन, त्याचा रंग आदि तपशील दिला गेला आहे तसेच कांही जणांनी अपेक्षित किमतही दिली आहे. या सेवेलाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Leave a Comment