काँग्रेसने फोडला ११८ उमेदवारांचा बार

congress
नवी दिल्ली – बुधवारी रात्री उशिरा काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये विद्यमान मंत्र्यांसह ११८ उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने दक्षिण कराडमधून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तर कुडाळमधून उद्योगमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना स्थान देण्यात आले आहे. राजेंद्र दर्डा(औरंगाबाद पूर्व) हर्षवर्धन पाटील(इंदापूर), बाळासाहेब थोरात(संगमनेर), नितीन राऊत, वसंत पुरके(राळेगाव), राधाकृष्ण विखे पाटील(शिर्डी), मधुकरराव चौधरी(रावेर), पंतगराव कदम(पलूस-कडेगाव) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दिवंगत केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांना लातूर शहर विभागातून उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर शहर मध्य विभागातून माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये शीतल म्हात्रे(दहिसर), सप्रा. चरण सिंग(मुलुंड), राजेश शर्मा(जोगेश्वरी पूर्व), राजहंस सिंह(दिंडोशी), भारत पारेख(चारकोप), अस्लम शेख(मालाड पश्चिम), बलदेव खोसा( वर्सोवा), अशोक जाधव(अंधेरी पश्चिम), सुरेश शेट्टी(अंधेरी पूर्व), कृष्णा हेगडे(विलेपार्ले), नसीम खान(कांदिवली), प्रवीण छेडा(घाटकोपर पश्चिम), चंद्रकांत हंडोरे(चेंबूर), कृपाशंकर सिंह(कलिना), बाबा सिद्दीकी(वांद्रे पश्चिम), वर्षा गायकवाड(धारावी), जगन्नाथ शेट्टी(सायन कोळीवाडा), मधुकर चव्हाण(भायखळा), सुशीबेन शहा(मलबार हिल), अमिन पटेल(मुंबादेवी) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.