लोंबार्गिनी हुराकेन भारतात – किंमत ३ कोटी ४३ लाख

hurakane
इटालियन सुपरकार मेकर लोंबार्गिनी हुराकेन भारतात सादर करण्यात आली असून तिची किंमत आहे ३ कोटी ४३ लाख. सध्या ही गाडी फक्त दिल्ली, मुंबई आणि बंगलोर या तीनच शहरात उपलब्ध केली गेली असून तिची डिलिव्हरी पुढच्या महिन्यापासून दिली जाणार आहे. या गाड्या सध्या इटालीतील अगाटा फॅक्टरीतून आयात केल्या जाणार आहेत.

ही गाडी संपूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. या गाडीत अॅल्युमिनियम आणि कार्बन फायबरचा भरपूर वापर केला गेला आहे. गाडीचे वजन १४२२ किलो आहे आणि गाडीला गॅलार्डोचे पॉवरफुल इंजिन आहे. ही गाडी ३.२ सेकंदात १०० किमीचा वेग पकडू शकते तर ९.९ सेकंदात २०० किमीचा वेग घेऊ शकते. गाडीचा टॉप स्पीड तासाला ३२५ किमी इतका आहे तर अॅव्हरेज आहे लिटरला ८ किमी.

Leave a Comment