
मुंबई – काही दिवसांपूर्वी आपचे नेते मयांक गांधी यांच्याकडे आम आदमी पक्षाच्या एका महिला कार्यकर्तीने आपचा कार्यकर्ता तरुण सिंग यांनी विनयभंग केल्याची तक्रार केली होती. पण मयांक गांधी यांनी सिंगवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे आरोप या महिलेने केला आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे केवळ एक राजकीय षडयंत्र आहे. ज्या मुलीकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे तिला या तक्रारीची माहितीच नाही, असा दावा आपचे नेते मयांक गांधी यांनी केला.
आपचे नेते मयांक गांधी यांनी उधळून लावले आरोप
या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार केली. मयांक गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यामुळे या प्रकरणाचा तपास लवकरच लागण्याची शक्यता आहे.
ज्या महिला कार्यकर्तीने माझ्यावर आरोप केले. तिच्या नावाचा वापर करून मयांक गांधी यांची बदनामी करण्यात आली, अशी कबुली तिने दिली असल्याचे यावेळी मयांक गांधी यांनी सांगितले.
