निसर्गाशी नाते असणारा कवी हरपला

shankar-vaidy
मुंबई – मंगळवारी पहाटे मुंबईत ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य शंकर वैद्य यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसांपासूनमुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

शंकर वैद्य यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी झाला होता. वैद्य यांना बालपणी निसर्ग सोबतीला होता. त्यामुळे त्यांच्या कवितांमधूनही निसर्गाचे दर्शन मोठ्या प्रमाणावर होत गेले. ‘कालस्वर’ हा शंकर वैद्य यांचा पहिला काव्य संग्रह होता. त्यानंतर तब्बल 27 वर्षांनी त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ‘दर्शन’ हे त्या काव्यसंग्रहाचे नाव. मधल्या 27 वर्षांच्या कालखंडात वैद्य यांनी मासिके, विशेषांक यातून कवितांचे लिखाण सुरू ठेवले होते. काव्यसमारंभांचे सूत्रसंचालनही ते अत्यंत आवडीने करत.

Leave a Comment