प्रबळ महिला यादीत चंदा कोचर दोन नंबरवर

chandakhochar
प्रतिष्ठीत फॉर्च्यून पत्रिकेने आशिया पॅसिफिक क्षेत्रातील पंचवीस प्रबळ महिलांच्या जाहीर केलेल्या यादीत आयसीआयसीआय च्या चंदा कोचर यांनी दुसरे स्थान पटकावले असून पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियातील प्रमुख बँक वेस्ट पॅकच्या प्रमुख गेल केली आहेत. या यादीत अन्य ८ भारतीय महिलांचाही समावेश असून पहिल्या दहात चार भारतीय महिला आहेत.

कोचर याच्यापाठोपाठ एसबीआयच्या प्रमुख अरूंधती रॉय चार नंबरवर आहेत. पाचव्या स्थानावर एपीसीएलच्या निशी वासुदेव आहेत तर १० वे स्थान अॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांना मिळाले आहे. अन्य भारतीय महिलांत किरण मुजुमदार शॉ, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सीईओ चित्रा रामकृष्ण, एचएसबीसीच्या नैना लाल किडवाई व टॅपच्य अध्यक्षा मल्लीका श्रीनिवास यांचा समावेश आहे.

फॉर्च्यून पत्रिकेने या महिलांनी केवळ कंपनीतील उच्च पदेच मिळविलेली नाहीत तर आव्हानात्मक परिस्थितीत उत्तम कामगिरी बजावून आपल्या कंपनीला पुढे नेले आहे अशा शब्दांत त्यांचा गौरव केला आहे.

Leave a Comment