इराणमध्ये व्हॉट्सअपवर बंदी

whattsapp
तेहरान : इराणच्या न्याय व्यवस्थेने प्रसारणमंत्र्यांनी चुकीच्या माहितीचे प्रसारण थांबविण्यासाठी वाइबर, टँगो आणि व्हाट्सऍपसारख्या सोशल साइटवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

सोशल साइटमुळे इस्लाम आणि नैतिक मूल्यांविरोधात अश्लील आणि अवमानास्पद माहितीचे प्रसारण होत असल्यामुळे विदेशी सरकार इराणची व्यवस्था बिघडविण्यासाठी अशा प्रकारचे मॅसेजचे पाठवत असल्याचेदेखील गुलाम-हुसैन मोहसेनी म्हणाले. इराणने यापूर्वीच २००६ साली यूटय़ूबवर बंदी घातली होती. मात्र, नंतर ती बंदी हटविण्यात आली होती. पण, २००९ साली पुन्हा त्यावर बंदी घालण्यात आली. २०१२ साली इराणने यू टय़ूबसह गूगलवरही बंदी घातली.

Leave a Comment