मायक्रोसॉफ्टचे २१०० कर्मचारी होणार बेरोजगार

microsoft
दिल्ली – रिसर्च आणि डेव्हलपमेन्ट लॅब मायक्रोसॉफ्ट सिलिकॉन व्हॅली कंपनी बंद करत असल्यामुळे कंपनीचे २ हजार १०० कर्मचारी बेरोजगार होणार आहेत, तर कंपनीच्या रिसर्च सेंटरमध्ये हजारपेक्षा अधिक वैज्ञानिकाना वॉशिंग्टन येथील मुख्य कार्यालयात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती मायक्रोसॉफ्टच्या अधिका-यांनी दिली.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या विविध ठिकाणी कार्यरत असणा-या २१०० कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे. यापूर्वी जुलै महिन्यात कंपनीने १३ हजार कर्मचा-यांना कामावरून काढले हेते. यात सर्वाधिक नोकियाच्या कर्मचा-यांचा समावेश आहे.

Leave a Comment