शिवसेनेचा भाजपाला नवा प्रस्ताव

yuti
मुंबई – शिवसेनेने भाजपाला जागावाटपाचा तिढा सुटण्यासाठी नवा प्रस्ताव सादर केला असून त्यानुसार शिवसेना १५५, भाजपा १२६ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ७ जागा अशा स्वरूपाचा हा नवा प्रस्ताव आहे.

शिवसेना-भाजपा युतीत जागावाटपाचा तिढा विधानसभा निवडणुकांची अधिसूचना लागू झाली तरी कायम असल्यामुळे महायुतीतील घटक पक्षांसह युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. जागावापाचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेने भाजपासमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावात भाजपाला १२६ जागा देण्याची तयारी शिवसेने दाखविली असून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ७ जागा देण्यात येणार आहेत. शिवसेनेने १५५ जागांची मागणी केली आहे. यामध्ये अन्य तीन घटक पक्षांना भाजपाच्या कोटयातून जागा द्याव्यात, त्याचबरोबर काहींना विधानपरिषदेवर प्रतिनिधीत्व देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने ठेवला आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून कोणताही प्रस्वात दिला नसल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. तसेच शिवसेनेचा प्रस्ताव भाजपा स्विकारणार का हा सुध्दा प्रश्नच असल्याचे राजकीय विश्लेषकांचा दावा आहे. यानिमित्ताने भाजपा-शिवसेना युतीतील जागावाटपाची चर्चा पुढे सरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment