फ्रान्सचेही इस्लामिक स्टेट अड्ड्यांवर हवाई हल्ले

france
बगदाद – इराकमधील इस्लामिक स्टेटच्या ताब्यातील भूभागावर फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांचे फ्रान्सचे पंतप्रधान ओलांद यांनी समर्थन केले असून फ्रान्स आपली सैन्यदले इराकमध्ये पाठविणार नाही असेही स्पष्ट केले आहे.

राष्ट्रपती कार्यालयातून जारी केलेल्या पत्रकानुसार इराकच्या उत्तरपूर्व भागातील इस्लामिक स्टेट शस्त्र डेपोवर फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांनी हल्ले सुरू केले आहेत. यात मोठ्या प्रमाणात इस्लामिक स्टेट अड्ड्यांचे नुकसान झाले असल्याचा दावाही केला गेला आहे. गेले कित्येक दिवस फ्रान्सची टेहळणी विमाने टोही इराक वायुसीमेमध्ये उडत असून त्यांनी इस्लामिक अड्डे असलेल्या ठिकाणांची माहिती मिळविली आहे. फ्रान्स कुर्दीश लढवय्यांना शस्त्रेही पुरवित आहे.

ओलांद यांनी असेही स्पष्ट केले आहे की फ्रान्स केवळ इराकमधील इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले करणार आहे. सिरीयातील इसिस व्याप्त भागावर हल्ले केले जाणार नाहीत. हे हल्ले आणखी कांही दिवस असेच सुरू ठेवले जाणार आहेत. अमेरिकेने इराक सिरीयातील इसिस तळावर आत्तापर्यंत १७० हवाई हल्ले केले आहेत. इराकचे सर्वोच्च शिया नेते अयातुल्ला अली अल सिस्मानी यांनी या हल्ल्यांचे स्वागत केले आहे.

Leave a Comment