राज ठाकरेंनी दाखल केली पोलिस ठाण्यात तक्रार

raj-thakcary
मुंबई – राज ठाकरे यांनी पोलिस ठाण्यात स्वत:च्या नावे सोशल साईटवर मोठ्या प्रमाणात फेक अकाऊंट बनवण्यात आल्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

फेसबुक, ट्वीटर आणि ऑर्कुट या सोशल नेटवर्कींग साईटवर राज ठाकरे यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात बनावट अकाऊंट उघडण्यात आले आहेत. यावर राज ठाकरे यांची व्यक्तिगत माहिती आणि छायाचित्रे पोस्ट करण्यात येत आहेत.

याबाबत राज ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सायबर क्राईमचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment