मनसे अध्यक्षांवर अदखलपात्र गुन्हा दाखल

raj-thakcary
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानानुसार कलम ५०६(धमकावणे), आणि कलम ५०५ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.

२१ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषणात त्यांनी प्रक्षोभक व्यक्तव्य केले होते. व्यापारी यशवंत शिंदे यांनी याबाबात तक्रार दाखल केली होती.

Leave a Comment