प्रचाराच्या पोस्टवरुन गायब झाली ‘युती’

yuti
मुंबई : फक्त राजकीय वक्तव्यातूनच नाही तर मुंबईत झळकणाऱ्या फलकांवरुनही शिवसेना आणि भाजप युती तुटण्याचे संकेत दिसत आहेत. कारण काल रात्रीपासून दोन्ही पक्षांनी मुंबईतील चौकाचौकात स्वतःची स्वतंत्र होर्डिंग उभारण्यास सुरुवात केली असून शिवसेनेच्या फलकांवरुन नरेंद्र मोदी किंवा भाजपचे नेते गायब आहेत. तर भाजपच्या फलकांवरून बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचे नेते गायब असल्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याची मानसिक तयारी केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली शिवसेना आणि भाजप युती जवळपास तुटल्यात जमा आहे. यासंदर्भात औपचारिक घोषणा होणे शिल्लक आहे.

Leave a Comment