टेनिसमधून ‘ली ना’ ची निवृत्ती

li-na
बिजींग – आतापर्यंत दोन वेळा ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणारी चीनची नहिला टेनिसपटू ‘ली ना’ आंतरराष्ट्रीय टेनिसमधून गुडघ्याच्या दुखापतीमुळे निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

‘ली ना’ टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. आज अखेर तिने या चर्चेला पूर्णविराम दिला. याबाबत तिने शुक्रवारी सोशल मिडीयाद्वारे आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली.

जानेवारी २०१४ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीत चीनची ‘ली ना’ अजिंक्य ठरली होती . त्यापूर्वी २०११ मध्ये तिने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. यासोबतच हे जेतेपद पटकावणारी ती आशियातील पहिली खेळाडू ठरली. ली ना हि आशिया खंडातील सर्वात यशस्वी टेनिसपटू राहिली आहे.

Leave a Comment