अखेर मनोज कुमारला मिळणार ‘अर्जुन’ पुरस्कार !

manoj-kumar
नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने मुष्टीयोद्धा मनोज कुमारला अखेर अर्जुन पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला असून मनोजला हा पुरस्कार आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर प्रदान करण्यात येईल. अशी माहिती क्रीडा मंत्री अजित शरण यांनी दिली.

मनोज कुमारने अर्जुन पुरस्कार न दिल्याने क्रीडा मंत्रालयाला दिल्ली उच्च न्यायालयात खेचले होते. मंत्रालयाने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा, असा सल्ला न्यायालयाने दिल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने मनोज कुमारला अर्जुन पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.

अर्जुन पुरस्कार निवड समितीने यंदा झालेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या मनोज कुमारला दुर्लक्षित केले होते. या समितीचे अध्यक्ष भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव हे आहेत. मनोजकुमार डोपिंग प्रकरणात सामील होता, असा आरोप असल्यामुळे मनोजच्या जागी मुष्टीयोद्धा जय भगवानची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

मनोज कुमार नाव असलेल्या एका अॅथलीट डोपिंगमध्ये दोषी आढळला होता. त्यामुळे नावसाधर्म्यामुळे चुकून बॉक्सर मनोज कुमार याची नावावर चर्चाच झाली नाही. त्यानंतर १५ अॅथलीटच्या यादीत नावाचा समावेश केला जाईल, असे आश्वासन क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मनोज कुमारला दिले होते. मात्र त्यानंतरही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर कंटाळून मनोजने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment