फ्लेमस् ऑफ वॉर- इसिसतर्फे नवा व्हिडीओ जारी

isis
वॉशिग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच इसिसने हॉलिवूड स्टाईलचा अमेरिकन सैन्यावर हल्ले चढविण्यासंदर्भातला स्फोटक व्हिडीओ जारी केला आहे. ५२ सेकंदाच्या या व्हिडीओत स्लो मोशनमध्ये अमेरिकन टँक उद्धस्त होताना तसेच अमेरिकन सैन्यावर पूर्वी केले गेलेले हल्ले दाखविले गेले आहेत. व्हिडीओत ओबामा आणि व्हाईट हाऊस पूर्ण अंधारात दाखविले गेले आहे तर अमेरिकन सैनिक आगीत जळत असल्याचे दाखविले गेले आहे.

फ्लेमस् ऑफ वॉर- फायटिंग हॅज जस्ट बिगन या नावाने हा व्हिडीओ यू ट्यूबवर दाखविला गेला मात्र यू ट्यूबकडून नंतर तो काढून टाकला गेला. इसिस हही दहशतवादी संघटनांच्या इतिहासातील सर्वात श्रींमत दहशतवादी संघटना ठरली आहे. अतिशय उत्तम प्रतीचे व्हीडीओ ते सातत्याने प्रकाशित करत आहेत. ओबामांच्या लष्करी सल्लागारांनी अमेरिकन लढाऊ विमानांचे इराकवरील हल्ले निष्प्रभ वाटले तर इसिस विरोधात अमेरिकन सैन्य इराकमध्ये उतरविले जाईल असे जाहीर केल्यानंतर कांही तासात हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. मात्र ओबामा यांनी कोणत्याही परिस्थितीत अमेरिकन सैन्य युद्धात उतरविले जाणार नाही असे सांगितले आहे.

Leave a Comment