पोप फ्रान्सिसना इसिसकडून धोका

pope
रोम – व्हॅटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस यांना इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांकडून धोका असल्याचे व्हॅटिकन मधील इराकी राजदूत हबीब अल सद्र यांनी एका इटालियन वर्तमानपत्राला सांगितल्याचे वृत्त टेलिग्राफने दिले आहे.

या वृत्तानुसार हबीब म्हणतात की पोपना ठार करण्याच्या ज्या धमक्या इसिस कडून दिल्या जात आहेत त्या गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. पोपला ठार करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांच्या धमक्या पोकळ समजल्या जाऊ नयेत. व्हॅटिकन प्रवक्ते फादर फेडेरिको लोबार्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोप या आठवड्यात मुस्लीम बहुल असलेल्या अल्बानियाला भेट देणार आहेत मात्र त्यासाठी कोणतीही जादा सुरक्षा घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. या भेटीतही ते व्हॅटिकन प्रमाणेच उघड्या जीपमधून प्रवास करणार आहेत.

पोपनी इसिस विरूद्ध परदेशी देशांनी कारवाई करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला पाठिबा दिला आहे. जगातील १.२ अब्ज कॅथॉलिकांचे नेते असलेले ७७ वर्षीय पोप फ्रान्सिस यांनी पुढच्या वर्षात अमेरिकेला भेट देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच चीन सरकारने मान्यता दिली तर त्या देशाच्या भेटीवर कधीही जायची तयारी दर्शविली आहे

Leave a Comment