वसई वाहतूक पोलिसांची दबंगगिरी?

traffic-police
वसई – वाहतूक पोलिसांच्या दबंगगिरीचा एक किस्सा व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा किस्सा वसईत घडला असल्याचे समजते आहे.

नो पार्किंगमध्ये मोटारसायकल पार्क केल्याच्या आरोपावरून एका युवकाची वाहतूक पोलिसाची शाब्दिक चकमक झालेली ह्या व्हिडीओत दिसत आहे. यावेळी हवालदाराने या तरूणाची कॉलर धरून त्याला ओढण्याचा प्रयत्नही केला आहे.

“मला लायसन्स दे, मला लायसन्स जमा करण्याचे अधिकार आहेत”, असे हा हवालदार पुन्हा-पुन्हा या युवकाला ठणकावून सांगतो आहे, त्यावर हा युवक म्हणतो आहे की “मी तुम्हाला काय केले, तुम्ही माझ्यावर हात का उगारत आहात, मी काय तुम्हाला काही बोललो आहे का?” असे संवाद या व्हिडीओत ऐकू येत आहेत.

दुनियेला वाहतुकीचे नियम शिकविणारे वाहतूक पोलीस या तरूणाला मोटारसायकलवर ट्रीपल सीट घेऊन जातात. या तरूणाच्या मोटरसायरकलाचा नंबर असताना, या तरूणाचे लायसन्स जमा करण्याची काय गरज होती?, पोलिसांची ही दबंगगिरी चव्हाट्यावर पाहून पोलिसांबद्दल नागरिकांच्या द्वेष व्यक्त होत असेल.

वसईच्या एव्हर शाईननगर जवळ ही घटना घडली असून पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सावंत, हवालदार अरूण सावंत आणि दीपक महाडीक यांच्याशी ही शाब्दिक चकमक झाली आहे.

वसई रेल्वे स्टेशनच्या बाहेर (वेस्ट) नो पार्किंग असा बोर्ड आहे, तिथे पोलिस लिहलेली एक बुलेट नेहमी पार्क केलेली असते. मात्र इतरांना तिथे बाईक पार्क करू दिली जात नाही. ही सोय फक्त एका हवालदारासाठीच असल्याची येथे चर्चा आहे.

पहा त्याचा व्हिडीयो

Leave a Comment