अजित पवारांना जेल मध्ये टाकणार – विनोद तावडे

vinod-tawade
मुंबई – अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही तोच महायुतीच्या नेत्यांना सत्तेत आल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. ‘शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यास, जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना आपण जेलमध्ये टाकणार,’ असे वक्तव्य भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केले आहे.

तावडे यांनी जागा वाटप होण्याअगोदरच आपली उमेदवारीही जाहीर केली असून आपण बोरिवलीमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगीतले.

‘सरकार आल्यानंतर गृहमंत्री आपणच होणार असेही तावडे म्हणाले. गृहमंत्री झाल्यावर आपण सर्व प्रथम जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना जेलमध्ये टाकणार. तसेच भ्रष्ट पोलिसांवर कारवाई करणार असल्याचेही तावडे यांनी सांगीतले.

Leave a Comment