दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन ठार

pakistan
इस्लामाबाद- एका पोलिस अधिका-यासह तीन जण पाकिस्तानात दहशतवाद्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यात ठार झाले.

दहशतवाद्यांनी खैबर प्रांतात हंगु जिल्ह्यातील ताल पोलिस ठाण्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस अधिकारी ठार झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत.

तर दुस-या एका घटनेत डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील कोलची पोलिस ठाण्याचे मुख्य पोलिस अधिकारी सफिउर रेहमान यांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. मात्र, हल्ला झाला त्यावेळी ते घरात नसल्याने बचावले. मात्र या हल्ल्यात त्यांच्या दोन भावांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी आहे.

दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्विकारलेली नाही. मात्र असे हल्ले तालिबानी दहशतवाद्यांकडूनच केले जात असल्याने हा हल्ला त्यांनीच केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment