राज ठाकरेंनी प्रकृती अस्वस्थेमुळे मुलाखती थांबवून हॉटेलमध्ये रवाना

raj-thackrey
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये मनसे इच्छुकांच्या मुलाखती घेताना मनसेअध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती बिघली आहे. अचानक तब्येत बिघडल्यानं राज ठाकरे मुलाखती सोडून हॉटेलवर रवाना झाले आहेत.

राज हे काल संध्याकाळी औरंगाबाद मध्ये विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी डेरेदाखल झाले होते.

राज ठाकरे हे आज सकाळपासूनच इच्छुकांच्या मुलाखती घेत होते. उस्मानाबाद आणि आणखी एका जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर अचानकच राज यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हॉटेलवर परतले.

गेल्या काही दिवसांपासूनच राज यांची प्रकृती थोडी खराब होती. त्यातच त्यांनी औरंगाबादचा दौरा नियोजित केला. आज सकाळपासूनच राज हे मुलाखतीच्या ठिकाणी शांत बसून असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

मात्र, काही वेळापूर्वी राज यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने हॉटेलवर परतणे पसंद केले आहे. थोडावेळ आराम करून राज हे पुन्हा मुलाखतीच्या ठिकाणी जाणार असल्याचेही कळते.

Leave a Comment