‘इसिस’विरोधात लढणार फ्रान्स

isis
अल-धफ्रा (यूएइ)- अमेरिकेने ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या विरोधात रणशिंग फुंकल्यानंतर आज इंग्लंडसमवेत फ्रान्सनेही उडी घेतली असून यासाठी फ्रान्सने टेहळणी करणारी विमानांचा वापर सुरू केला आहे.

फ्रान्सच्या पहिले टेहळणी विमान आपल्या नियोजित कामासाठी इराकी आणि यूएई देशांच्या मान्यतेनंतर रवाना करण्यात आले, असे फ्रान्सचे संरक्षणमंत्री जीन-वायस ली ड्रायन यांनी सांगितले.

‘इसिस’चा पाडाव करण्यासाठी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ड्रायन आले होते. आंतरराष्ट्रीय मदत पथकातील डेव्हिड हेन्सचा ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला. त्यानंतर ही तातडीने परिषद भरवण्यात आली.

इंग्लंडने इराकवर आपली टेहळणी विमाने पाठवली आहेत. यासाठी इंग्लंडने सायप्रस येथे आपला तळ तयार केला आहे.

Leave a Comment