भाजपाची पहिली यादी दोन ते तीन दिवसात : विनोद तावडे

vinod-tawade1
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ७० ते ८० उमेदवारांची आगामी विधानसभा निवडणूकांसाठी नावे दिल्लीला पाठविली असून, येत्या दोन ते तीन दिवसात भाजपाची पहिली यादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती दिली.

भाजपाच्या संसदीय बोर्डाची विधानसभा निवडणूकीच्या जागावाटपासाठी बैठक आज मुंबईत पार पडली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थि हेते. भाजपाच्या ७० ते ८० उमेदवारांची नावे मंजूरीसाठी दिल्लीला पाठविली आहेत. लवकरच उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असून, उमेदवारांची पहिली यादी येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर होईल, अशी माहिती तावडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

Leave a Comment