पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री हेतील : विनोद तावडे

vinod-tawade
चाळीसगाव : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे भाकीत केले आहे. पण मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ खडसे आणि गिरिश महाजन यांना संधी द्यावी लागेल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

चाळीसगाव येथून भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याचा प्रारंभ झाला. त्यावेळी आयोजित सभेत तावडे बोलत होते. पंकजा मुख्यमंत्री होणार असल्या तरी गृहमंत्री आपणच होणार असल्याचे तावडे यांनी या वेळी सांगितले. लोकसहभागातून सुरू झालेल्या संघर्ष यात्रेतून बाबांचे सत्ता बदलाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचा विश्वास पंकजा मुंडे-पालवे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment