२०१५च्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकस्तानशी भिडणार भारत

world-cup
मेलबर्न – पुढील वर्षी म्हणजेच २०१५मध्ये १४ फेब्रुवारीपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे भारत आणि पाकिस्तान टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत.

जगभरातील एकूण १४ संघ यामध्ये सहभागी होणार असून या स्पर्धेत आयसीसीने दोन ग्रुप केले आहेत. या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे यावेळी भारत आणि पाकिस्तान ‘ग्रुप बी’ या एकाच ग्रुपमध्ये आले आहेत.

विश्वचषकातला पहिला सामना १४ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्चमध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड दरम्यान होईल. तर दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होईल.

यंदाच्या विश्वचषकाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी भारताची पहिली गाठ पाकिस्तानशी पडणार असून हा सामना ओव्हल, एडिलँडमध्ये दिवस-रात्र खेळला जाणार आहे.

आयसीसीने पाडलेले दोन ग्रुप्स :
ग्रुप ‘ए’ : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेश, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, आयरलँड
ग्रुप ‘बी’ : भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, झिम्बाम्वे, आयरलँड, यूएई

Leave a Comment