फौजिया खान यांना मंत्रीपद सोडवेना

fauzia-khan
मुंबई – राष्ट्रवादीच्या मंत्र्याने आपला पदभार मंत्रीपदाचा कार्यकाळ उलटून गेला तरी सोडलेला नसल्यामुळे शिवसेनेने कारवाईची मागणी केली आहे.

१२ मार्चला राज्याच्या शिक्षण आणि आरोग्यमंत्री फौजिया खान यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून फौजिया खान ह्या मंत्रीपदाचा कार्यकाळ संपूनही कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ उलटून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी त्यांनी मंत्रीपद सोडलेले नाही.

याबाबत शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी राज्यपालांकडे तक्रार केली आहे. तसेच त्यांनी कारवाईचीही मागणी केली आहे.

Leave a Comment