बंद होणार एचएमटीची घडयाळे

hmt
नवी दिल्ली : केंद्र सरकारने एचएमटी ही घडयाळ उत्पादक कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हातातील ताईत बनलेल्या एचएमटी घडयाळाची टिकटिक इतिहास जमा होणार आहे.

भारतीय बाजारपेठेत ७० ते ९०च्या दशकात या कंपनीने चांगले बस्तान बसविले होते. मात्र, २००० सालापासून ही कंपनी तोटयात आहे. अलिकडच्या काळात तर कर्मचाऱयांचे पगार देणेही अवघड झाल्याने कंपनीला टाळे ठोकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Leave a Comment