प्रिन्सेस केट पुन्हा गर्भवती

kate
लंडन- ब्रिटनच्या गादीची भावी राणी केट मिडलटन पुन्हा गर्भवती असल्याचे निवेदन क्लारेन्स हाऊसतर्फे देण्यात आले आहे. या वृत्तामुळे महाराणी एलिझाबेथ आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी आनंद व्यक्त केला आहे.

ब्रिटनचा राजपुत्र विलियम्स आणि केट यांचा पहिला मुलगा जॉर्ज अलेक्झांडर आता वर्षाचा झाला आहे. गेल्या जुलैत त्याचा जन्म झाला होता. ड्यूक अॅन्ड डचेस ऑफ केब्रिज यांच्या घरी दुसर्‍या वेळेस पाळणा हलणार असल्याची खबर येताच महाराणी एलिझाबेथ तसेच मिडलटन कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे तर पंतप्रधान कॅमेरून यांनी या बातमीने आंनद झाल्याचे द्विट केले आहे.

Leave a Comment