सर्वाधिक महागडा खेळ डेस्टीनी लाँच

destiny
जगातला सर्वाधिक महागडा व्हिडीओ गेम डेस्टीनी आज म्हणजे ९ सप्टेंबरला लाँच केला जात असून हा गेम बनविणार्‍या कंपनीने त्यावर ३ हजार कोटी रूपये खर्च केला असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्याच दिवशी किमान १ कोटी युजर हा गेम ऑनलाईन खेळतील असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

जुलैत या गमचे डेमी व्हर्जन लाँच केले गेले तेव्हा ४६ लाख युजरनी तो खेळण्याचा आनंद लुटला होता. त्यामुळे या गेमविषयी लोकांत उत्सुकता आहे. हा गेम जग बदलेल असाही कंपनीचा दावा आहे.२०१४ मध्ये ८० ते दीड कोटी कॉपीज विकल्या जातील असाही अंदाज वर्तविला जात आहे. बंजी डेव्हलपर्स नी तयार केलेला हा गेम ७०० वर्षांनंतरचे जग दाखविणारे सायन्स फिक्शन आहे. यात युजर स्पेसमध्ये मंगळ, बुध आणि चंद्राची सफर करू शकणार आहेत. एलियन्सची सोलर सिस्टीम वाचविण्याचे काम गेम खेळणार्‍यांना करायचे आहे.

हा गेम फक्त ऑनलाईनच खेळता येणार आहे. त्यामुळे जगभरातील युजर प्लेअर एकमेकांशी ऑनलाईन बातचितही करू शकतील. हा गेम दहा वर्षे सुरू रहावा अशी योजना कंपनीने बनविली आहे. दरवर्षी या गेमची नवीन डिस्क येणार असून त्यात मागच्या गेमचीच कहाणी पुढे सुरू राहणार आहे. गेमचा साऊंड ट्रॅक आणि थीम साँग पॉल मॅकार्ट यांनी तयार केले असून तो पीएस ३, ४, एक्स बॉक्स ३६०, एक्स बॉक्स वन प्लॅटफॉर्मवर लाँच केला जात आहे.

Leave a Comment