ओबामा मोदीं २९-३० सप्टेंबरला भेटणार

obama
वॉशिग्टन- या महिन्यात अमेरिका भेटीवर जाणार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व्हाईट हाऊसमध्ये २९ आणि ३० सप्टेंबरला भेटणार असल्याचे प्रेस सचिव जोश अर्नेट यांनी प्रसार माध्यमांना कळविले आहे.

ओबामा मोदी या दोन दिवसीय भेटीत दोन्ही देशांच्या तसेच जगासाठीही फायदेशीर ठरतील अशा अनेक विषयांवर चर्चा करून दोन्ही देशांतील परस्पर संबंध अधिक दृढ होण्यासाठी बोलणी करणार आहेत असेही जाहीर केले गेले आहे. ओबामा मोदींच्या स्वागतास उत्सुक आहेत असे सांगून अर्नेट म्हणाले की या भेटीत आर्थिक विकास, परकीय गुंतवणूक, सिक्युरिटी ऑपरेशन्स, दोन्ही देशातील कोलॅबोरेशन संबंधी विषयांवर चर्चा होणार असून त्यातून दीर्घकाळची निती ठरविली जाणार आहे. हे दोन्ही नेते सिरीया आणि इराक प्रश्नांवरही विचार विनियम करून त्यातून कांही चांगले निष्पन्न व्हावे यासाठी एकत्र काम करण्याबाबतही बोलणी करतील.

Leave a Comment