या महिन्यात मिळणार कायमस्वरूपी पीएफ क्रमांक?

epfo
नवी दिल्ली – चालू महिन्यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेकडून सदस्यांना कायमस्वरूपी पीएफ खाते क्रमांक (यूएएन) मिळण्याची शक्यता असून यासाठी अधिकृत तारीख जाहीर झालेली नसून पंतप्रधान कार्यालयाशी ईपीएफओ आणि श्रम खात्याकडून यासंबंधी चर्चा सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

या अधिका-याने ऑगस्टपर्यंत २.५ कोटी खात्यांची केवायसीसह कामे पूर्ण झाली असून १५ सप्टेंबपर्यंत यात १ कोटींची भर घालण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. इपीएफओकडून मिळणारा हा नंबर सदस्यांना नोकरी बदलल्यानंतरही वापरता येणार असल्यामुळे पीएफ खाते कायमस्वरूपी होणार असून खाते हस्तांतर आणि दाव्यांची संख्या घटण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment