शरद पवारांना ‘त्यांनी’ दिला दगा – पिचड

madhukar-pichad
मुंबई – आदीवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी बबनराव पाचपुते यांच्यावर शरद पवार यांना दगा दिला असल्याची घणाघाती टीका केली असून यावेळी त्यांनी पाचपुते यांना आपल्या पक्षात घेणाऱ्या भाजपवरही हल्लाबोल केला.

मधुकर पिचड यांनी बबनराव पाचपुते हे भ्रष्ट मंत्री असल्याचा आरोप केला आहे. भाजपने अनेक वेळा त्यांच्या विरुद्ध विधानसभेत आरोप केले होते आता हाच पाचपुते भाजपला कसा चालतो, असा सवालही पिचड यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात मधुकर पिचड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून पाचपुतेंच्या भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे पिचड सादर करणार आहेत. पाचपुतेंनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात भाजप नेत्यांनी केलेल्या भाषणाचे संकलन पिचड यांनी केले आहे. ही सगळी भाषणं पिचड मोदींना पाठवणार आहेत. भाजपकडे असे कोणते तीर्थ आहे, जे डोक्यावर टाकल्यावर पाचपुते भ्रष्टाचार मुक्त होती असेही पिचड म्हणाले.

Leave a Comment