मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सानियाची धडक

sania-mirza
न्यूयॉर्क – भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने ब्रुनो सोरेस या नव्या जोडीदाराच्या साथीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

बिनसीडेड युंग जान चॅन आणि रॉस हचीन्स जोडीचा सानिया-ब्रुनो जोडीने उपांत्यफेरीच्या सामन्यात ७-५, ४-६, १०-७ असा पराभव केला. चॅन-हचीन्स जोडीने सानिया-ब्रुनो जोडीला कडवी लढत दिल्याने सामना रंगतदार झाला. तिसरा आणि निर्णायक सेट टायरब्रेकरमध्ये खेचला गेल्यानंतर अनुभवाच्या जोरावर सानिया-ब्रुनो जोडीने सेटसह सामना जिंकला.

अमेरिकन ओपनमध्ये महिला दुहेरीतही सानियाला अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकच्या साथीने तिने उपांत्यफेरी गाठली आहे. उपांत्यफेरीत सानिया-ब्लॅक जोडीचा सामना मार्टिना हिंगिस आणि फ्लाविया पेनेटा यांच्याशी होणार आहे.

Leave a Comment