मोदींच्या अमेरिका स्वागत समारंभ प्रवेशासाठी लॉटरी

modi3
वॉशिग्टन- न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भारतीय अमेरिकन कम्युनिटीतर्फे २८ सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभात प्रवेशासाठी लॉटरी काढली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. जपानचा दौरा अत्यंत यशस्वी करून आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिनाअखेर अमेरिकेच्या दौर्‍यावर जात असून हा दौरा जपानपेक्षाही अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरेल असे सांगितले जात आहे. मोदींच्या या दौर्‍यात संरक्षण, उर्जा, अंतर्गत सुरक्षा या विषयांवर ऐतिहासिक करार केले जातील असे मानले जात आहे. तसेच मोदींच्या भारतात अमेरिकन गुंतवणुकीच्या प्रयत्नांनाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल असे जाणकार सांगत आहेत. कारण यापूर्वी गुजराथमध्ये गुंतवणूक केलेल्या अनेक अमेरिकन उद्योजकांनी मोदींबाबत सकारात्मक अहवाल ओबामा प्रशासनाला दिला आहे.

मोदींच्या स्वागतासाठी इंडो अमेरिकन नागरिकांच्या ४०० हून अधिक संस्थांनी एकत्र येऊन भारतीय अमेरिकन कम्युनिटी संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेतर्फे मोदींचा स्वागत समारंभ न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये होत आहे. या समारंभासाठी १ लाखाहून अधिक नागरिकांनी येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र या ठिकाणी २० हजार उपस्थितांचीच व्यवस्था होऊ शकणार असल्याचे सर्व संस्थांचे सदस्य तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज मागविले गेले आहेत. संस्था सदस्यांसाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारी संपली असून त्याकाळात २० हजार अर्ज आले आहेत. सर्वसामान्यांसाठी अर्ज करण्याची मुदत ७ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानंतर या अर्जातून लॉटरी काढली जाणार आहे असे जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment