आता नवी मुंबईतही बनणार गगनचुंबी इमारती

cm
नवी मुंबई: राज्य सरकारने विधान सभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील रहिवाशांना मोठा दिलासा दिला असून म्हाडाच्या धर्तीवर नवी मुंबईतल्या सिडकोच्या इमारतींनाही अडीच एफएसआय देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यामुळे नवी मुंबईतील बांधकामांना तीस मजल्यापर्यंत बांधकाम करता येणार आहे.

cm1

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घोषणा नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शन केंद्राच्या उद्घाटनावेळी केल्यामुळे सिडकोच्या धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

यामुळे रहिवाशांना आधीच्या तुलनेत कमी किंमतीत घरे उपलब्ध होणार आहेत. अडीच एफएसआयच्या देण्याच्या घोषणेमुळे नवी मुंबईतही ३० मजल्यांपर्यंतचे टोलेजंग टॉवर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केवळ दीड एफएसआयला आत्तापर्यंत नवी मुंबईत परवानगी मिळत असल्यामुळे ६ ते ७ मजल्यांच्या वर एकही मजला चढवता येत नव्हता. मात्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे मुंबईपाठोपाठ नवी मुंबईत गगनचुंबी इमारतींची बजबजपुरी वाढणार हे निश्चित आहे.

1 thought on “आता नवी मुंबईतही बनणार गगनचुंबी इमारती”

  1. Vishwambhar kanade

    उर्वरित गिरणी कामगारांना कधी मिळणार घर

Leave a Comment