शहजादचा दिलशानला धर्मपरिवर्तनाचा सल्ला

dilshan
इस्लामाबाद -श्रीलंकेचा क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान याला मैदानावरच मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा सल्ला देऊन पाक क्रिकेटपटू अहमद शहजादने वाद ओढवून घेतला आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतील शनिवारी झालेल्या अखेच्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या प्रकरणाची चौकशी करत आहे.

शहजादच्या या सल्लावर दिलशान याने जे उत्तर दिले ते स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र त्यावर शहजादने ‘तर परिणामांसाठी तयार रहा’ असे धमकी वजा उत्तर दिले आहे.

या प्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शहजाद याला समन्स बजावले आहे. या वक्तव्याचे बोर्डाने स्पष्टीकरण मागीतले आहे. दरम्यान पीसीबी या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे बोर्डाचे व्यवस्थापक अकबर यांनी सांगितले.

तिलकरत्ने दिलशान याचे वडिल मुस्लीम आहेत. तर आई बौद्ध आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येताना त्याने तुवान मोहम्मद दिलशान ऐवजी तिलकरत्ने मुदियानसेलगे दिलशना असे नाव वापरण्यास सुरुवात केल्याचे त्याचे लहानपणाचे प्रशिक्षक राजन परानवितना यांनी सांगितले.

पहा या घटनेचा व्हिडीओ

Leave a Comment