
जळगाव : अजून जागावाटपावर काही निर्णय झाला नसला तरी याच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांचाही घोडा दौडत असल्याचे समोर आले आहे.
‘भावी मुख्यमंत्री’च्या उल्लेखाने गहिवरले नाथाभाऊ
मुख्यमंत्री होण्याची महायुतीतील अनेक नेत्यांच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नसून या महत्वकांक्षा कोणत्या ना कोणत्या मुहूर्तावर विविध मार्गांनी या इच्छा समोर येत आहेत.
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचीही मुख्यमंत्रीपदाची आशा आता, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरळ सरळ व्यक्त झाली नसली तरी लपूनही राहिलेली नाही. खडसे यांनी थेट मागणी न करता आत्तापर्यंत या पदासाठी उत्तर महाराष्ट्र वंचित राहिल्याचे म्हटले आहे.
खडसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही ‘उत्तर महाराष्ट्राची’ खंत बोलून दाखवली. मग, खडसे यांच्या या खंत वजा मागणीला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही समर्थन दिले.
