माकपच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला

todfod1
पुणे : आज दुपारी दोनच्या सुमारास पुण्याच्या वर्दळीच्या अप्पा बळवंत चौकातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर काही अज्ञातांनी हल्ला केला.

todfod2

या हल्लेखोरांनी केरळमधील आरएसएसच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यांचा बदला घेत असल्याचे सांगत कार्यालयात तोडफोड करण्यास सुरूवात केली. सुमारे १० ते १५ हल्लेखोर एकाच वेळी कार्यालयात घुसले. या घटनेच्या दरम्यान माकपचे ७ ते ८ कार्यकर्ते घटनास्थळी होते. त्यानंतर त्यांनी कम्युनिस्ट कार्यकर्त्याना धक्काबुक्की केली तसेच कार्यालयात सर्वत्र इंजिन ऑइल टाकून कागपत्रांचे आणि कार्यालयीन साहित्यांचे नुकसान केल्यामुळे ते कार्यालयाला आग लावण्याच्या उद्देशाने आले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कम्युनिस्ट नेते डॉ. अशोक ढवळे यांनी हा हल्ला राष्ट्रीय स्वंसेवक संघाच्या कार्यकत्यांनी केला असल्याचा आरोप केला आहे.

Leave a Comment