काँग्रेसच्या प्रचाराचा श्रीगणेशा मुंबईच्या आझाद मैदानातून

congress
मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जख्मी झालेली काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागली असून मुंबईत आज काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा श्रीगणेशा हुतात्मा चौकात शहीदांना श्रद्धांजली व प्रचारज्योत प्रज्वलित करून केल्यानंतर ही प्रचारज्योत पुढे आझाद मैदानात आणून महाज्योत प्रज्वलित केली. ५४ जिल्ह्यांसाठी ५४ ज्योती प्रज्वलित करुन विविध जिल्ह्यांमध्येही प्रचाराला सुरुवात होईल.

यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे, समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते.

Leave a Comment