स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीला मुदतवाढ

suprem-court
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने मुकूल मुदगल समितीला आयसीसीचे चेअरमन एन.श्रीनिवासन यांच्याविरुद्ध तसेच आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

आपला अहवाल मुदगल समितीने शुक्रवारी न्यायालयात सादर केला होता. हा अहवाल सोमवारी न्यायालयात उघडण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने समितीला ही मुदतवाढ दिली असून त्याचबरोबर श्रीनिवासन यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारता येणार नाही असे सांगत, श्रीनिवासन यांना धक्का दिला आहे.

Leave a Comment