आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वलस्थानी विराजमान टीम इंडिया

icc
दुबई – इंग्लंडविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यात मिळवलेल्या विजयाच्या जोरावर टीम इंडियाने पुन्हा एकदा आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत ११४ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाली आहे.

या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका ११३ गुणांसह दुस-या स्थानावर तर श्रीलंका १११ गुणांसह तिस-या स्थानावर आहे. झिम्बाब्वेकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ १०६ गुणांसह पाचव्या स्थानी आहे तर पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यात भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. अद्याप या मालिकेतील दोन सामने बाकी आहेत. यापूर्वी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला इंग्लकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे कसोटी क्रमवारीत भारताची घसरण झाली होती.

Leave a Comment