पीटीव्ही कार्यालयावर आंदोलकांनी चढवला हल्ला

pakistan
इस्लामाबाद : सोमवारी पाकिस्तानच्या सरकारी टेलीव्हीजन कार्यालयात पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे सरकारविरोधी हजारो आंदोलक घूसले आणि त्यांनी प्रसारण बंद पाडले.

आंदोलकांनी पीटीव्हीचे कॅमेरे तोडले आणि त्याचे प्रसारण बंद पाडले. या आंदोलकांना यावेळी लष्कराच्या कोणत्याही अडथळयांचा सामना करावा लागला नाही. शेकडो आंदोलक वृत्तवाहीनीच्या कार्यालयात घूसले आणि त्यांनी प्रसारण बंद पाडले. त्यानंतर पाक रेंजर्स आणि लष्काराने संपूर्ण परिसराचा ताबा घेतला आणि त्यांनी प्रसारण पुर्ववत सुरु केले. इम्रान खान आणि धर्मगुरु ताहिर उल कादरी यांच्या कार्यकर्त्यांनी शरीफ यांच्याविरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे.

Leave a Comment