जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला कांस्य पदक

sindhu
कोपनहेगन- भारताच्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. स्पेनच्या कॅरोलिना मॅरिनने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत सिंधूचा १७-२१, १५-२१ असा पराभव केला. अर्थात शुक्रवारी चीनच्या शिक्सियन वॅँगचा सिंधूने १९-२१, २१-१९, २१-१५ असा पराभव करत स्पर्धेतील कांस्य पदक निश्चित केले होते.

उपांत्य फेरीत जरी तिचा पराभव झाला असला तरी जागतिक स्पर्धेत सलग दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. गेल्यावर्षीही सिंधूने ग्वांगजो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते.

या स्पर्धेत अद्याप भारताच्या एकाही बॅडमिंटनपटूला रौप्यपदक जिंकता आले नव्हेत. त्यामुळे शुक्रवारी जरी सिंधूचे पदक निश्चित झाले असले तरी ति रौप्यपदक जिंकून नवा इतिहास निर्माण करेल का याची सर्वांना उत्सुकता होती.

Leave a Comment