अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करून हत्या

murder
पुणे – हडपसर येथील तरुणाने एका १० वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मुलाने आरडाओरड केल्याने तरुणाने मुलाचे डोके पाण्यात बुडवून त्याला बेशुद्ध करत गळा आवळून त्याचा खून केला. नंतर आईवडिलांच्या मदतीने मृतदेह घाटात टाकला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ओम अजित बोरकर (१०) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी ऋषल मधुकर कळाणे (१८), मधुकर कळाणे, नलिनी मधुकर कळाणे या तीन आरोपींना अटक केली आहे. हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित मोहिते यांनी सांगितले की, ओम बोरकर हा हडपसरमध्ये सातववाडी येथे राहणारा चौथीचा विद्यार्थी होता. बुधवारी संध्याकाळी क्लासला जात असताना त्याचे अपहरण ऋषलने करून त्याला बळजबरीने घरी नेले. त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करून त्याची हत्या केली.

Leave a Comment