अमेरिकन ओपनच्या तिस-या फेरीत पेस-स्टेपानेकची जोडी

leander-peas
न्यूयॉर्क – अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या तिस-या फेरीत दुहेरीतील भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस आणि त्याचा झेक जोडीदार राडेक स्टेपानेकने प्रवेश केला असून या सहाव्या सीडेड पेस-स्टेपानेक जोडीने चीन तैईपीच्या येन हसन लू आणि झेक रिपब्लिकच्या जीरी वेसले जोडीचा ७-६(३), ६-३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

पहिल्या सेटमध्ये दोघांनी अनेका चूका केल्याने हा सेट टायरब्रेकरमध्ये खेचला गेला. टायरब्रेकरमध्ये लू-वेसले जोडीने चूका कायम ठेवल्याने पेस-स्टेपानेक जोडीने त्याचा फायदा उचलत पहिला सेट जिंकला.

पुढच्या फेरीत पेस-स्टेपानेक जोडीची गाठ अकराव्या सीडेड स्पॅनिश जोडी र्मासेल ग्रानोलरस-मार्स लोपेझ आणि हॉलंडची रॉबिन हासे-इगोर सिसलिंग यांच्यातील विजेत्याशी पडणार आहे. ज्यूनियर गटाच्या महिला पात्रता फेरीत ओजस्विनी सिंहने अलेक्झांड्रा सॅनफोर्डचा ६-३, ६-२ असा पराभव करुन दुस-या फेरीत प्रवेश केला.

Leave a Comment