मोदी मुस्लीम आणि पाक विरोधीच – मुशर्रफ

musharraf
भारत आणि पाक सरकार दोन्ही देशातील संबंध सुधारावेत यासाठी वेगवेगळ्या पातळीवर बोलणी करण्याचा प्रयत्न करत असतानाच पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी मात्र मोदी पाक आणि मुस्लीम विरोधीच आहेत आणि त्यांनी पाकसंबंधात कांही गैर पावले उचलल्यास त्याचा गंभीर परिणाम होईल असे बजावले आहे. एका दूरदर्शनवाहिनीवर बोलताना मुशर्रफ यांनी हे विधान केले आहे.

मुशर्रफ म्हणाले की मोदी आणि सर्व भारतीय यांनी त्यांचे वर्तन पाकविरोधातच आहे याची शंकाही घेऊ नये. ते पंतप्रधान झाले असले तरी त्यांची त्याची सगळी कार्डस अद्याप उघड केलेली नाहीत. मोदी आणि सर्व भारतीय पाकला इजा पोहोचविणार यात आम्हाला शंका नाही मात्र आम्ही समर्थ आहोत आणि आमचा देश अण्वस्त्रधारी देश आहे. तुमचे सगळे ऐकून घ्यायला तुम्ही व्हाईसरॉय नाही. असेही वक्तव्य केले आहे.

मुशर्रफ यांच्या या वक्तव्यावर भाजपचे खासदार व माजी लष्करप्रमुख व्ही.के सिंग यांनी मुशर्रफ आजारी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. व आजारामुळे ते कांहीही बरळत आहेत तेव्हा आपल्याला त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे मत व्यकत केले आहे.