के. शंकरनारायणांना राज्य मंत्रीमंडळाने दिला निरोप

sankarnarayan
मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने आज महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायणन आणि त्यांच्या पत्नी राधा यांना भावपूर्ण निरोप दिला.
sankarnarayan2
के. शंकरनारायणन आणि त्यांच्या पत्नीला मलबार हिल स्थित सहय़ाद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री चव्हाण यांच्या सहका-यांनी पुष्पगुच्छ देऊन, पुढील वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी के. शंकरनारायणन यांनी आपल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात राज्य सरकारने दिलेल्या १०० टक्क्यांहून अधिक सहयोगाबद्दल आभार व्यक्त केले.
sankarnarayan1
केंद्र सरकारकडून के. शंकरनारायणन यांची मिझोरामला बदली केली. यावेळी त्यांनी मिझोरामला जाण्यास नकार देत, पदाचा राजीनामा राष्ट्रपतींना सादर केला. त्यानंतर ओमप्रकाश कोहली यांची प्रभारी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, सी. विद्यासागर राव यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment